Sanvad News बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस संपन्न.

बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस संपन्न.

भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण  संस्थेच्या बासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी, ख्यातनाम शिक्षण तज्ज्ञ आणि केंद्राचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी "राष्ट्रीय शिक्षण दिवस " संजय कुलकर्णी सचिव भिलवडी शिक्षण संस्था, भिलवडी यांचे शुभहस्ते मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस हार घालून त्यांचा जन्म दिन व राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करणेत आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण सर, महाविद्यालयाचा सर्व कला व विज्ञान शाखेचा स्टाफ उस्थित होता.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्था सचिव, मा. संजय कुलकर्णी हे म्हणाले की,मौलाना अब्दुल कलाम आझाद हे प्रसिद्ध भारतीय मुस्लिम विद्वान, कवी, लेखक, पत्रकार आणि स्वतंत्र भारताचे ते थोर सेनानी होते. त्यांनी हिंदु - मुस्लिम एकीकरणासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांचा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राला म्हणजेच स्वतंत्र पाकिस्तानाला विरोध होता. खिलाफत आंदोलनामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. १९२३मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते. स्वतंत्र भारतानंतर त्यांनी आर प्रदेशातील रामपूर जिल्हयातून १९५२ साली सांसदीय निवडणूक जिंकून ते भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्याबरोबरच ते सत्याग्रही, क्रांतीकारक, शिक्षण तज्ज्ञ , थोर विचारवंत, थोर सेनानी होते. शिक्षणमंत्री असताना भारतीय विद्यापीठ आयोगाची स्थापना करण्यामध्ये त्यांचे कार्य सर्वोच्च आहे असे ते म्हणाले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.एस.डी. कदम यांनी मानले.







To Top