कोविड 19 मुळे मार्च महिन्यापासून बंद असणाऱ्या शाळा २३ नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाची जबाबदारी प्रशासनाने निश्चित केली असून स्थानिक आरोग्य केंद्रात शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दि.१७ नोव्हेंबर रोजी अशा आशयाचे शासन परिपत्रक काढले आहे.शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रक क्रमांक.संकीर्ण २०२०/प्र. क्र.१४९/एस.डी.६,दिनांक१०नोव्हेंबर २०२०.नुसार सोमवार दि.२३ नोव्हेंबर पासून इयत्ता ९ वी ते १२वी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता.त्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना ही जाहीर ही करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या जबाबदाऱ्या ही निश्चित करण्यात आल्या होत्या. शाळांनी सॅनिटायझर,थर्मल गन,पल्सआॅक्सिमीटर इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले होते.पण शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या खर्चाची तरतूद करण्यात आली नव्हती.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा,खाजगी संस्थांच्या शाळा यांना कोणतेही वेतनेत्तर अनुदान नाही.तसेच
मोठ्या प्रमाणात स्वयं अर्थसाहित्य शाळांची संख्या आहे.या मोठ्या खर्चाचा विचार करता कारोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कशी करण्याची हा प्रश्न सर्वांना पडला होता.मात्र ही जबाबदारी शासनाने स्थानिक प्रशासनावर सोपविली आहे.
शिक्षकांना करावी लागणार तपासणी..
१७ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गाला शिकविणाऱ्या संबंधित शिक्षकांनी शाळेच्या जवळ असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन को १९ साठी आर.टी.पी.सी.आर.वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.शिक्षकांची ही तपासणी मोफत करण्याची व्यवस्था करावी असे आदेश राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.