पुणे पदवीधर निवडणूकीमध्ये केवळ निवडणुकीच्या हंगामा पुरते नव्हे तर कायम स्वरुपी समाज आणि पदवीधरांच्या प्रश्नासाठी लोकचळवळ बनून राहिलेले डॉ.अमोल पवार हेच सर्वाधिक सक्षम व कार्यक्षम उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक तथा पाणी चळवळीचा जलनायक पुरस्कारप्राप्त भाई संपतराव पवार यांनी केले.
पुणे पदवीधर निवडणूकीतील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. अमोल पवार यांच्या पलूस येथील संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई होते. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडणुकीत डॉ.अमोल पवार यांच्या विजयाचा संकल्प करीत उत्साहामय वातावरणात कार्यालयाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी बोलताना आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले की, आम आदमी पक्षाने सुशिक्षित व योग्य व्यक्तीला विधान परिषद निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पुणे मतदारसंघातील सर्वच जिल्ह्यातून डॉ.अमोल पवार यांच्या उमेदवारीला वाढता पाठींबा आहे. सुशिक्षित बेरोजगार, युवा वर्गाच्या विविध प्रश्नांवर डॉ.अमोल पवार सातत्याने आवाज उठवीत आहेत.महामार्गबाधित शेतकऱ्याना नुकसानभरपाई मिळवून देणे, सन २०१९ मधील महापूर,तसेच कोरोना महमारीच्या काळात त्यांनी सर्वसामान्य लोकांना केलेली मदत आणि त्यांचे विविध सामाजिक कार्य सर्वज्ञात आहे.त्यामुळे त्यांचा या निवडणुकीत होणारा विजय हा आपल्या माणसांचा विजय असेल.
डॉ.अमोल पवार म्हणाले की,स्पर्धक उमेदवारावर टिका न करता,सकारात्मक दृष्टीकोनातून आपल्याला पुढे जायचे आहे. ही निवडणुक आपल्याला Vote for Work याप्रमाणे लढवायची आहे.
यावेळी आम आदमी पार्टीचे कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष उत्तम पाटील, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष संतोष घाडगे, आपचे सचिव वासिम मुल्ला, मिरज तालुका अध्यक्ष आरिफ मुल्ला, महाराष्ट्र नशाबंदी चळवळीचे राज्य सचिव अमोल मडामे, कॉम्रेड मारूती शिरतोडे, सांगली जिल्हा सुधार समितीचे अभिषेक खोत, शिवाजी जाधव, भिमराव परले, प्रशांत जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.