कोवीड -१९ मुळे आठ महिन्याच्या प्रदीर्घ अशा विश्रांती नंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरू होणार आहेत.शाळा सुरू होणार म्हणून विद्यार्थी व पालक वर्गांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र सावधान..पालकांची लेखी संमती शाळेकडे सादर केल्या विद्यार्थ्यांना शाळेत थेट प्रवेश मिळणार नाही.
याबाबत सरकारने परिपत्रक काढून शाळा सुरू करण्या बाबत विहित नमुन्यात सूचना दिल्या आहेत.जशी स्थानिक प्रशासन,शिक्षण संस्था,शाळा व्यवस्थापन समिती यांची जबाबदारी निश्चित केली आहे तशी पालकांचीही महत्त्वपूर्ण जबाबदारी निर्धारित केली आहे.
१) उप सचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शिक्षण विभाग, मुंबई यांचे दि.१५/६/२०२० चे परिपत्रक.
२) उप सचिव महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शिक्षण विभाग, मुंबई यांचे दि.१०/११/२०२० च्या मार्गदर्शक सूचना.
३) मा.शिक्षणाधिकारी यांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांना दिलेल्या सूचना.
या तिन्ही संदर्भित पत्रानुसार पालकांची जबादारी निश्चित केली आहे.शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुढील नमुन्यात संमत्तीपत्र लिहून द्यावयाचे आहे.माझा पाल्य आपल्या शाळेत,महाविद्यालयात शिकत असून कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा/महाविद्यालय बंद करण्यात आल्या होत्या.२३ नोव्हेंबर पासून इयत्ता ९ वी ते १२ या वर्गासाठी शाळा/महाविद्यालयात प्रत्यक्ष अध्यापन होणार आहे.त्यासाठी मी माझ्या पाल्यास शाळेत/महाविद्यालयात पाठविण्यास तयार आहे.त्यासाठी मी संमती देत आहे.या मजकुराखाली पालकांना स्वाक्षरी करून,पूर्ण नाव,मोबाईल नंबर,पालकांचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे.अशा मजकुरात पालकांनी संमत्तीपत्र दिल्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.