विविध राजकीय पक्ष जनमतातून निवडून येऊ न शकणाऱ्या नेतेमंडळींच्या पुनर्वसनाचा अड्डा म्हणून पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीकडे बघत आहेत.जिकडे तिकडे जमणाऱ्या नेत्यांच्या गर्दी मधून पदवीधर मंडळी आणि त्यांचे प्रश्न गायब झाले असल्याची खंत अमृतवेल या मासिकाचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी व्यक्त केली.आम आदमी पार्टीचे पुणे पदवीधर मतदासंघातील उमेदवार डॉ.अमोल पवार यांना आपला पाठींबा जाहीर केला.यावेळी ते बोलत होते.डॉ.अमोल पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
धर्मेंद्र पवार हे अमृतवेल या मासिकाचे संपादक आहेत.गेली वीस वर्षे ते उद्योगविश्व,राजकारण,समाजकारण,शिक्षण,कला,क्रीडा,शेती व शेतकरी,युवावर्ग,पदवीधरांच्या प्रश्नांवर कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर संपर्काचे मोठे नेटवर्क त्यांनी उभारले आहे.विविध क्षेत्रात सकारात्मक वृत्त्तीने काम करणारे विधायक नेतृत्व अशी त्यांची सर्वदूर ख्याती आहे. २०१४ ची पुणे पदवीधरची निवडणूक त्यांनी स्वबळावर लढविली होती.त्यावेळी त्यांना पसंती क्रमांक एकची पाच हजार मते प्राप्त झाली होती.
यापुढे बोलताना धर्मेंद्र पवार म्हणाले की,पदवीधर मतदासंघ हा पदवीधरांसाठी राखीव आहे.मात्र विविध राजकीय पक्षांनी त्यामध्ये घुसखोरी केली आहे. आम आदमी पार्टी ही सर्वसामान्यां साठी काम करणारा पक्ष आहे.या पक्षाची धोरणे व तत्वे सर्वांना आवडतात. डॉ.अमोल पवार यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही.त्यांनी कोणतेही लाभाचे पद भोगले नाही.तरीहीपदरमोड करून पदवीधरांसाठी,शेतकरी वर्गांसाठी,रंजल्या गांजल्या लोकांसाठी ते मानवतेच्या भूमिकेतून काम करीत आहेत.केवळ नावापुढे आमदार लावण्यासाठी नव्हे तर पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी,त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ते मैदानात आहेत.त्यांच्या पाठीशी पदवीधरांची एकजुटीची ताकद उभारुया..पहिल्या पसंतीचे मत नोंदवून विधान परिषदेवर संधी देवुया.या हेतूने आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी डॉ.अमोल पवार यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी आम आदमी पार्टीचे उमेश बागवे,सुभाष तंवर,अजित खाडे, महाराष्ट्र नशाबंदी चळवळीचे राज्य सचिव अमोल मडामे,अभिषेक खोत आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते.