Sanvad News दैनिक लोकपत्रच्या संपादकांवर कायदेशीर कारवाई करा-शिक्षक भारतीच्या वतीने मागणी

दैनिक लोकपत्रच्या संपादकांवर कायदेशीर कारवाई करा-शिक्षक भारतीच्या वतीने मागणी

दैनिक लोकपत्रचे संपादक यांनी शिक्षकांच्या बद्दल आपल्या संपादकीय लेखांमध्ये शिक्षकांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद व असंवेदनशील विधाने केलेली आहेत त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व अतिशय संतापाचे वातावरण झाले आहे  त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अवमान केला आहे त्यांनी शिक्षकांच्या विषयी असंवैधानिक भाषा वापरली आहे त्याअनुषंगाने   जत (सांगली) तालुका शिक्षक भारतीच्या वतीने आज जत चे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना निवेदन देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे  उचित कारवाई न झाल्यास  शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती तीव्र  आंदोलन करेल. 
पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी सांगितले की संबंधित संपादकांवर योग्य ती कारवाई निश्चितच करू
असे आश्वासन दिले.
   यावेळी शिक्षक भारती चे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत उपाध्यक्ष अविनाश सुतार जितेंद्र बोराडे बाळासाहेब सोलनकर रावसाहेब चव्हाण आप्पासाहेब ढोणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 
   


To Top