Sanvad News राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दया; अन्यथा शिक्षक भारती तीव्र आंदोलन छेडणार - महेश शरनाथे

राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दया; अन्यथा शिक्षक भारती तीव्र आंदोलन छेडणार - महेश शरनाथे

राज्यातील सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळालेला आहे सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील 12 ते 13 हजार कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही.  सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या विसंगत धोरणामुळे हे कर्मचारी वेतन आयोगापासून वंचित राहिलेले आहेत. अद्याप याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले नाहीत.  याबाबत शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांना याबाबत यापूर्वीच निवेदन केलेले आहे भेटी घेतलेल्या आहेत. 
कोविड १९च्या कालावधीत दिव्यांग शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेले आहे दिव्यांग शिक्षकांना अॉनलाईन शिक्षणात समाविष्ट करून घेतलेले आहे.  विविध प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला आहे.
शासनाच्या उदासीन धोरणामुळे व दप्तर दिरंगाई मुळे या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दिवाळीपूर्वी सदरचे आदेश निघाले नाहीत तर  दिव्यांग कर्मचारी यांच्या वतीने आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती तीव्र आंदोलन करणार आहे अशी माहिती शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी दिली यावेळी कृष्णा पोळ कादर आत्तार सुरेश खारखांडे बालम मुल्ला महेशकुमार चौगुले यांच्यासह सर्व  तालुकाध्यक्ष  शिक्षक भारती पदाधिकारी उपस्थित होते.
To Top