Sanvad News मिरज येथील चाँद उर्दू स्कूल हायस्कूलमध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

मिरज येथील चाँद उर्दू स्कूल हायस्कूलमध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न.

मिरज येथील चाँद उर्दू स्कूल हायस्कूल मध्ये ईद ए मिलाद निमित्त ऑनलाइन नात व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता या चार गटातील प्रथम विजेत्याचे सादरीकरण झूम ॲप वर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
ऑनलाईन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इम्तियाज म्हशाळे सर( उर्दू केंद्रीय प्राथमिक शाळा हातकणंगले प्रभारी केंद्र प्रमुख) तसेच प्राध्यापक इब्राहीम लक्ष्मेश्वर सर (अल्लामा इक्बाल हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज कुरुंदवाड) हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी कुमारी सनोबर पटेल हिने स्वागत व प्रस्ताविक ने केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले वक्तृत्व नंतर मा. म्हशाळे सर यांना विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधला व त्यांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा करत विद्यार्थ्यांना आतापासूनच वेग-वेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जेणेकरून भविष्यात त्यांना नीट ,जीई व युपीएससी-एमपीएससी सारख्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे होईल. तसेच त्यांनी सूत्रसंचालिका सनोबर पटेल हिची प्रशंसा करत शाळेच्या उत्तम नियोजनाबद्दल संस्थाचालक व मुख्याध्यापिके चे अभिनंदन केले. मा. इब्राहिम लक्ष्मेश्वर सरांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास पाहून त्यांची प्रशंसा केली व विद्यार्थी घरी असतानासुद्धा शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले व अशा स्पर्धांचे वारंवार आयोजन करावे असे सांगितले.
या स्पर्धेमध्येतील प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असे हुमेरा मुश्रीफ,शहजिन शेख ,मोहम्मद उवैस डोंगरे, मोहम्मद जाहिद खतीब.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका  पालेगार मॅडम यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी  पालकांनी केले होते.
To Top