Sanvad News १ नोव्हेंबर अंशदान पेन्शन योजनेच्या विरोधात काळा दिन;शिक्षक समितीने काळ्या फिती लावून केला निषेध

१ नोव्हेंबर अंशदान पेन्शन योजनेच्या विरोधात काळा दिन;शिक्षक समितीने काळ्या फिती लावून केला निषेध


अंशदान पेन्शन योजना बंद करुन जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून १ नोव्हेंबर रोजी शिक्षक समितीने काळ्या रंगाची फीत लावून निषेध केला असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी सांगितले.
           सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आमराई सांगली येथे बैठक घेऊन १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द केली आहे. या तारखेपासून जे कर्मचारी शासकीय सेवेत आले आहेत त्यांना शासनाने जुन्या पेन्शन योजनेऐवजी DCPS ही अन्यायकारक योजना  कार्यन्वित केली त्याचा काळ्या फिती लावून निषेध केला आणि १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
            आयुष्यभर शासकीय सेवा केल्यानंतर निवृत्तीनंतर पेन्शनचा आधार राहणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची त्यावेळी पूर्णपणे परवड होणार नाही.भविष्य अंधकारमय होणार आहे. यातच एखाद्या डिसीपीएस बांधवांचे निधन झाले तर ,त्यांच्या कुटुबियांना गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच ही अन्यायकारक डिसीपीएस   योजना रद्द करावी, सर्वांना समान काम समान न्याय या तत्वाने जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून १ नोव्हेंबर हा दिवस काळ्या फिती बांधून काळा दिन म्हणून निषेध करण्यात आला.
             यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्नेते विश्वनाथ मिरजकर,किरणराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, किसन पाटील, शशिकांत भागवत, दयानंद मोरे, सतीश पाटील, माणिक पाटील, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनिल गुरव, महादेव माळी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले रुग्णालयाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, केंद्रप्रमुख अविनाश जकाते, तुकाराम गायकवाड, बाळासाहेब आडके, शशिकांत बजबळे, उत्तम (युटी) जाधव, राजाराम सावंत, रमेश पाटील, श्रीकांत माळी, शिवाजी पवार, श्रेणिक चौगुले, दीपक कोळी, विनोदकुमार पाटील,महादेव (मज)पाटील, राजाराम शिंदे, बाबासाहेब शेख, विकास चौगुले, सुरेश नरुटे, श्रीकांत शिंदे, सुरेश पाटील, शाम ऐवळे, संजय शिंदे, राजू शेख, नंदकुमार नाटेकर यांचेसह शिक्षक बँकेचे संचालक, संघटनेचे जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, तासगाव, विटा व सां.मि.कुपवाड महापालिका तसेच शिक्षक समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
To Top