भाजप-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी कारभारापुढे 'आप'चाच पर्याय असल्याचे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदार संघातील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल पवार यांनी केले.
मिरज येथे आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रमुख रंगा राचुरे यांचे प्रमुख उपस्थितीती डॉ.अमोल पवार यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिका-यांची बैठक मध्ये संपन्न झाली,यावेळी ते बोलत होते.
पदवीधरांच्या न्याय व हक्कासाठी डॉ.अमोल पवार यांच्यासारखी स्वच्छ चरित्र्याची व्यक्ती निवडूण येणे काळाची गरज आहे. ही तुमची-आमची नैतिक जबाबदारी आहे.प्रत्येक कार्यकर्त्याने ही आपली जबाबदारी स्विकारून कामाला लागण्याची गरज असल्याचे मत रंगा राचुरे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ.अमोल पवार म्हणाले की,आपण सर्वजण पुढचे काही दिवस ताकदीने कामाला लागलो तर शंभर टक्के परिवर्तन घडेल.पदवीधरांसाठी यंदा अशा परिवर्तन करणा-या मानसाची गरज आहे.असा माणूस जर विधानपरिषदेत गेला तरच सत्ताधार्यांना पदवीधरांच्या समस्यांचा जाब विचारू शकेल. असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. अमोल पवार यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ.अमोल पवार यांना अनुकुल वातावरण असल्याचे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केले.
सर्वांनी डॉ. अमोल पवार यांना या पदवीधर निवडणुकीत विजयी करण्यासाठी जिवाचे रान करण्याची घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला,सांगली जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.