Sanvad News राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचा-यांचे प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावू - डॉ अमोल पवार; सोलापूर येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद.

राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचा-यांचे प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावू - डॉ अमोल पवार; सोलापूर येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद.



दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या धर्तीवर आम्ही राज्यातील सर्व प्रकारच्या कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न मार्गी लावणार असून, दिल्ली सरकारप्रमाने जुन्या पेंन्शन चा प्रश्नही निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत,यासाठी तुम्ही मला साथ द्या असे आवाहन डॉ.अमोल पवार यांनी केले.

पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोलापुर येथे आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ. अमोल पवार यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिका-यांची बैठक झाली. ही बैठक  आम आदमी पार्टीचे राज्य प्रमुख रंगा राचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. 


यावेळी डॉ.अमोल पवार  उपस्थितांशी संवाद साध ताना  म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासुन पदवीधर निवडणूका होतात विधानपरिषदेवर  पदवीधर आमदार निवडुन जातात. पण पदवीधरांचे प्रश्न कधीच सोडवले जात नाहीत. विविध क्षेत्रातील पदवीधरांचे प्रश्न मोठे आहेत पण ते आजअखेर कधीच सोडवले गेले नाहीत. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या धर्तीवर आम्ही पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत व त्याचा विश्वास म्हणून आम्ही आमचा वचननामा बाँन्ड पेपर वर देत आहोत. 

डॉ. अमोल पवार यांच्यासारखी स्वच्छ चरित्र्याची व्यक्ती निवडुन आलीच पाहिजेत आणि ही जबाबदारी स्विकारून आपन कामाला लागण्याची गरज आहे असे मत रंगा राचुरे यांनी यावेळी व्यक्त केले. 
डॉ. अमोल पवार यांच्या उमेदवारीने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश निर्माण झाला आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ अमोल पवार यांना अनुकुल वातावरण आहे असे दिसुन येत आहे. 



यावेळी आम आदमी पार्टीचे सोलापुर जिल्ह्यातील प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते. सर्वांनी डॉ अमोल पवार यांना या पदवीधर निवडणुकीत विजयी करण्यासाठी जिवाचे रान करण्याची घोषणा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र सचिव वासिम मुल्ला, अजिंक्य शिंदे, अँड. खतीब, सोलापुर जिल्हाध्यक्ष एम पाटील, जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधीकारी उपस्थित होते.
To Top