Sanvad News नियमावलीचे पालन करीत भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल चे कामकाज सुरू

नियमावलीचे पालन करीत भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल चे कामकाज सुरू


भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेने लॉक डाउन नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शैक्षणिक वर्ष 2020/21हे वर्ष न भूतो न भविष्य असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही कारण covid-19 या संसर्गजन्य आजारामुळे अनेकांचा बळी घेतला आहे, त्याचा दुष्परिणाम या शिक्षण क्षेत्रा वरती फार मोठ्या प्रमाणात झाला आहे. जवळ जवळ 15 मार्च ते 22 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्र शासनाने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये व शिक्षकांमध्ये हे निर्माण झाली होती. परंतु शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणाली अवलंबली आणि विद्यार्थ्यांना घर बसल्या मोबाईल वरती ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. परंतु यामध्ये शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पुढे अनेक समस्या येत होत्या, नोव्हेंबर महिन्या मध्ये महाराष्ट्र शासनाने 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची परवानगी दिली.


इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी यांनी शासन निर्णयानुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
शाळा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापिका विद्या टोणपे त्यांनी शासन नियमानुसार 23 नोव्हेंबरला. शाळा समितीची मीटिंग आयोजित केली. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. विश्वास चितळे, विश्वस्त श्री. गिरीश चितळे, सेक्रेटरी एस .एन. कुलकर्णी सर, संचालक डाॅ. श्री श्री.सुनिल वाळवेकर सर , विभाग प्रमुख श्री. के. डी .पाटील सर, मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे मॅडम, पालक प्रतिनिधी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस ठाणे प्रत्येकी एक प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये शासन नियमानुसार covid-19 संदर्भात सर्व उपाययोजना व दक्षता घेण्याची ठरवून शाळा 24 नोव्हेंबरला सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आला.
शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांची शाळेच्या दरवाज्या मध्ये टेंपरेचर ,पल्स रेट ,याची तपासणी करून सॅनीटायजर करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स मध्ये उभे करण्यात आले, मुख्याध्यापिकांनी शाळेमध्ये विद्यार्थिनां घ्यावयाची दक्षता व नियम सांगितले, शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्यामध्ये व शिक्षकांच्यामध्ये उत्साह पाहावयास मिळाला.
To Top