महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे .पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे पूर्व माध्यमिक- इयत्ता आठवी या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये ३ विद्यार्थिनीनी स्थान पटकावले आहे.. या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे..
कु समृद्धी पटकुरे (गुण २२२)शहरी सर्वसाधारण यादीत ६७ वे स्थान पटकावले. कु. अनुराधा माळी (गुण २०४) शहरी सर्वसाधारण यादीत १२६ वे स्थान पटकावले.कु. मधुरा करांडे (गुण २००)शहरी सर्वसाधारण यादीत १४६ वे स्थान पटकावले.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे , उपाध्यक्ष सुनील रावळ, सचिव जयंतीलाल शहा , संचालक विश्वास रावळ, सर्व संचालक मुख्याध्यापक टी.जे .करांडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी ,पालक, शिक्षक यांचे अभिनंदन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक टी.जे.करांडे , स्कॉलरशिप विभागप्रमुख ए .जे.सावंत , विकास गुरव तपासे सर, ढाेबळे सर, ,सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी केले.