धनगाव ता.पलूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु.विभावरी आनंदा उतळे हिने इयत्ता ५ वी.पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २६८ गुण प्राप्त करुन राज्य गुणवत्ता यादीत सातवा तर सांगली जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक प्राप्त केला.विभवरी उतळे हिची पलूस येथील जवाहर नवोदय विदयालयासाठी ही निवड झाली आहे.
तिला वर्गशिक्षक अजित जाधव सर्व शिक्षक स्टाफ,पालक यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी प्रसाद
कालगावकर,केंद्रप्रमुख संजय डोंगरे, यांच्यासह गावातील पदाधिकारी वर्गाने या यशाबद्दल घरी जाऊन तिचा अभिनंदन पर सत्कार केला.