महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पाठपुराव्यास यश.

मुदतीत संगणक धारण न करणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वसुली आदेशास शासनाने स्थगिती दिली असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे.मा.मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी तात्काळ लक्ष घालत २६ नोव्हेंबर च्या आदेशाला स्थगिती देण्याचे आदेश निर्गमित केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी दिली आहे.
३१ डिसेंबर २००७ पर्यंत संगणक अर्हता धारण न करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतन वाढी बंद करून वसुली करण्याचे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ नोव्हेंबरला आदेश काढले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना २६ नोव्हेंबर चे शासन आदेश स्थगित करण्याची मागणी केली होती.
यासंबंधाने राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांचे सह ,शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ(आण्णा) मिरजकर, किरण गायकवाड, राज्य संपर्कप्रमुख सयाजी पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत, उत्तम पाटील, माणिक पाटील, रमेश पाटील, वजीर मुल्ला आदीं पदाधिकाऱ्यांच्या शिष्टंडळाने २७ नोव्हेंबर रोजी इस्लामपूर (जिल्हा -सांगली) येथे भेट घेतली होती.संगणक अर्हतेच्या संबंधाने निर्माण झालेल्या अडचणी लक्षात आणून दिल्या.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शिक्षकांनी संगणक अर्हता धारण केली आहे. राज्यातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या त्याकाळच्या अडचणी आणि शिक्षकांना संगणक अर्हता धारण करण्यासंबंधाने सुस्पष्ट असा आदेश नसल्यामुळे २००७ पूर्वी शिक्षक अहर्ता धारण करू शकले नाहीत.मात्र आता शिक्षकांनी अहर्ता धारण केली असल्यामुळे वेतनवाढीची वसूली करण्यात येऊ नये. यासंबंधाने लक्ष घालण्याची विनंती सर्वांनी केली. नामदार जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांना लगेच फोन करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले.
अवघ्या चोवीस तासात शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वसुली त्यासंबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या निवेदनावर निर्णय घेऊन काढलेल्या आदेशात बद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंतराव पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.