Sanvad News २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित;३१ डिसेंबर ही नवीन मनिव दिनांक..

२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित;३१ डिसेंबर ही नवीन मनिव दिनांक..

      

पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यात आले असून २५/११/२०२० च्या शासन निर्णयानुसार २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी वयाबाबात ३१ डिसेंबर हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला आहे. 

सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सरी(इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) साठी प्रवेशाचे किमान वय ३+ वर्षे निश्चित केले. तर ३१ डिसेंबर ही वयाबाबत नवीन मानिव दिनांक आहे.इयत्ता - १ ली साठी प्रवेशाचे किमान वय ६+ वर्षे निश्चित केले. तर ३१ डिसेंबर ही वयाबाबत  मानिव दिनांक आहे.

२५/१/२०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आला होता.त्यामुळे ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात जन्म असलेल्या पालकांच्या शाळा प्रवेशाबाबत २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात अडचणी निर्माण होत होत्या.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,त्यांचे एक वर्ष वाया जाऊ नये म्हणून मानिव दिनांक बदलून तो ३० सप्टेंबर ऐवजी ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.


यामुळे झालेले बदल पुढीलप्रमाणे..

  • १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधी दरम्यान जन्म दिनांक असलेल्या बालकास नर्सरी(इयत्ता -१ ली.पूर्वीचा ३ रा.वर्ग) मध्ये प्रवेश घेता येणार आहे.
  • १ ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधी दरम्यान जन्म दिनांक असलेल्या बालकास एल. के.जी.(इयत्ता -१ ली.पूर्वीचा २ रा.वर्ग) मध्ये प्रवेश घेता येणार आहे.
  • १ ऑक्टोबर २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधी दरम्यान जन्म दिनांक असलेल्या बालकास इयत्ता -१ ली. मध्ये प्रवेश घेता येणार आहे.
 ऑक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ मधील बालकांना नर्सरी किंवा एल.के.जी.या दोन्ही पैकी एका वर्गात पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेता येणार आहे.

सदर आदेशानुसार सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश द. गो.जगताप शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे.- १.यांनी दिले आहेत.
To Top