हजारवाडी ता.पलूस येथील हिंदुस्तान पेट्रोलयम कॉर्पोरशन लिमिटेड (एच.पी.सी.एल.) या कंपनीच्या वतीने ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर या प्रशालेस संगणक संच प्रदान करण्यात आले.
कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एच. पी. सी. एल. नेहमी सहकार्य करेल असे मत चीफ मॅनेजर के. ए. वाघंबरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
के. ए. वाघंबरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी संगणक संचाचा स्वीकार केला.
एच. पी. सी. एल. चे ऑफिसर अनिकेत महांकाल,सुपरवायझर रमेश सूर्यवंशी, ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव,विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.