Sanvad News कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा मिरज तालुकास्तरीय शिक्षक स्नेह मेळावा संपन्न.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा मिरज तालुकास्तरीय शिक्षक स्नेह मेळावा संपन्न.


कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या मिरज तालुक्यातील शिक्षकांचा स्नेह मेळावा न. पा. शाळा नं. आठ मध्ये संपन्न झाला. 
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे, विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, उपाध्यक्ष महमदरफिक पटेल, कोषाध्यक्ष दयानंद सरवदे उपस्थित होते. सुरुवातीला तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्ह्य़ातील संघटनेच्या माध्यमातून चाललेल्या कार्याचा आढावा जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी घेतला. 


संघटना शिक्षक बंधु-भगिनीसाठी का आवश्यक आहे हे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याची ढाल संघटना बनत असते म्हणून संघटना महत्त्वाची आहे असे मत विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे यांनी व्यक्त केले. यावेळी मिरज तालुका मुख्य संघटकपदी नागसेन कदम, उपाध्यक्षपदी प्रदिप गवळी,सदस्यपदी सुभाष सातपुते यांची तर जिल्हा कोषाध्यक्षपदी रामचंद्र टोणे, खानापूर तालुका अध्यक्षपदी दादासो कांबळे, कडेगाव तालुका अध्यक्षपदी भगवान भंडारे यांची निवड करण्यात आली.


या सर्वांना निवडीची पत्रे विभागीय अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष दयानंद सरवदे यांनी केले तर आभार भगवान भंडारे यांनी मानले.
To Top