Sanvad News अपूर्वा व आदित्य प्रशांत गायकवाड मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष पूरस्काराने सन्मानितः कुंडलच्या शिरपेचात मानाचा तुरा

अपूर्वा व आदित्य प्रशांत गायकवाड मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष पूरस्काराने सन्मानितः कुंडलच्या शिरपेचात मानाचा तुरा


कुंडल ता.पलूस येथील अपूर्वा प्रशांत गायकवाड व आदित्य प्रशांत गायकवाड या दोन्ही बहिण भावांना एकाचवेळी मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परीषदेचा "मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार" प्रदान करणेत आला. इचलकरंजी(जि.कोल्हापूर) येथे झालेल्या केंद्रीय क्रीडा परीषदेच्या अधिवेशनामध्ये हे पुरस्कार वितरण करणेत आले असून या पुरस्काराने कुंडलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला असून प्रशिक्षक सागर साळुंखेचे यामध्ये मोठे योगदान आहे.


         मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परीषदेच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात अत्युच्य कामगिरी करणार्या खेळाडूंना २९ आॕगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनीच  "मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार" दिला जातो.  मात्र यंदा कोरोनामुळे हा समारंभ पुढे ढकलण्यात आला होता. यंदा हा कार्यक्रम इचलकरंजी येथे  माजी खासदार राजु शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व सभापती डी.आर.जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
   अपूर्वा व  आदित्य यांनी आजपर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्केटींग स्पर्धातून यश मिळविले असून बेळगाव येथे झालेल्या सलग २४ व ५२ तास स्केटींग च्या विश्वविक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या या विश्वविक्रमांची नोंद "गिनिज वर्ल्ड रेकाॕर्ड", यासह एशिया बुक रेकाॕर्डस्, इंडीया बूक आॕफ रेकाॕर्डस्, ग्लोबल रेकाॕर्डस, चिल्ड्रन्स रेकाॕर्डस, इंडीयन अॕचिव्हर्स बूक आॕफ रेकाॕर्डस्, युनिक वर्ल्ड रेकाॕर्डस् मध्ये नोंद झाली आहे.


     अपूर्वा हिने स्केटींग बरोबरच तायक्वांदो, तलवारबाजी मध्येही अनेक स्पर्धातून यश मिळविले आहे. तर आदित्यने ही स्केंटींग बरोबरच तायक्वांदोचेही प्रशिक्षण घेतले आहे.
 अपूर्वा व आदित्य गायकवाड हे गेली दहा वर्षे एस.एम.स्पोर्टस अॕकेडमी मध्ये प्रशिक्षक सागर साळुंखे, व सौ. माया साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली स्केटींग व तायक्वांदो चे प्रशिक्षण घेत आहेत. आजपर्यंत त्यांनी मिळविलेल्या यशामध्ये प्रशिक्षक सागर साळुंखे व माया साळुंखे यांचा मोलाचा वाटा आहे.
    अपूर्वा ही आर्टस, काॕमर्स अॕन्ड सायन्स काॕलेज पलूस(जि.सांगली) मध्ये बी.एस्स.सी चे शिक्षण घेत असून तीने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष
रामचंद्र (भाऊ) पाटील, सचिव धोंडीराम शिंदे,
प्राचार्य डॉ.आर.एस.साळुंखे व क्रीडाशिक्षक प्रा, व्ही.बी.पाटील यांचेसाह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
      तर आदित्य गायकवाड हा इस्लांपूर येथील ज्ञानदिप इंटरनॕशनल स्कूल चा विद्यार्थी असून त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, संचालक केदार पाटील व धनंजय पाटील, प्राचार्या सौ. वैशाली थोरात व क्रीडा शिक्षक सागर साळुंखे,सचिन साळुंखे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून.
   त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल परीसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
To Top