Sanvad News महिला शिक्षकांना न्याय देण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटणार- अनिल बाबर; विटा येथे फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

महिला शिक्षकांना न्याय देण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटणार- अनिल बाबर; विटा येथे फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण



शिक्षक भारती सांगलीच्या वतीने देण्यात येणारा सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा विटा येथील सत्यम शिवम मंगल कार्यालय येथे आमदार अनिल बाबर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. 

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे कादर आत्तार कृष्णा पोळ विद्या चव्हाण सुनीता शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 
निवडणूक कालावधीत महिला शिक्षकांच्यावर अन्याय होतो एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात   शिक्षिकांना आदेश दिले जातात. महिला शिक्षिकांना गैरसोयीत टाकले जाते याबाबत राज्य निवडणूक आयुक्त यांना भेटून राज्यभरातील महिला शिक्षिकांसाठी धोरण निश्चित करू तसेच विषय शिक्षक वेतनश्रेणी शिक्षण सेवक मानधन वाढ करणे यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांना सोबत घेऊन राज्यस्तरावर प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे बैठक आयोजित केली जाईल. जिल्हा परिषद स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेला मदत करून अशी भूमिका अनिल बाबर यांनी मांडली.

सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. सावित्री आणि फातिमा यांच्या नावामुळे या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे झाले आहे या पुरस्कार वितरण करण्याची संधी शिक्षक भारती संघटनेने मला उपलब्ध करुन दिली त्याचा निश्चितपणे आनंद वाटत आहे. शेतीबरोबरच आरोग्य व शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक  करण्यासाठी कटिबद्ध आहे असेही बाबर म्हणाले यावेळी गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी जिल्हास्तरावरील प्रश्नांचा ओहापोह केला शिक्षण कमिटीवर शिक्षक भरतीचा सदस्य घ्यावा जिल्ह्यातील विषय शिक्षक वेतनश्रेणी प्रश्न निकाली निघावा, बालसंगोपन रजा मंजूर केल्या जात नाहीत त्या मंजूर व्हाव्यात सेवानिवृत्त लोकांची मिळणारी उपदाने वेळेवर मिळत नाहीत यासह अनेक शैक्षणिक प्रश्नावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. 

खानापूर आटपाडी व कडेगाव तालुक्यातील महिला शिक्षकांना सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्या चव्हाण कृष्णा पोळ व पुरस्कार प्राप्त शिक्षिका योगिता लोखंडे यांनी मनोगते व्यक्त केली. 

कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष प्रताप टकले सरचिटणीस किशोर कांबळे निलेश टकले सुयश खिलारे संजय पिंजारी दादा महाडिक बिरू मुढे  यांनी केले सूत्रसंचलन नामदेव गुरव व उज्वला कुंभार यांनी केले तर आभार प्रताप टकले यांनी मानले.
To Top