सांगली व कोल्हापूर जिल्हा पर्यादित जयसिंगपूर येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विजय वावरे क्रिकेट अकॅडमी भिलवडी ने स्मृती मानधना क्रिकेट अकॅडमी वर अंतिम सामन्यात पुन्हा एकदा सहज मात करत विजेतेपद मिळवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सांगली च्या संघावर भिलवडी च्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच अंकुश ठेवत एकामागून एक धक्के देत सांगली ला फक्त 94 धावावर च रोखले.यश कवठेकर याने 4, पार्थ पोतदार याने 2, हर्षवर्धन येसुगडे 2 आयुष् रक्ताडे याने 2 बळी मिळवले.
95 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भिलवडी च्या फलंदाजांनी 2 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केले. भिलवडी चा आघाडीचा फलंदाज साहिश् परदेशी याने फलंदाजी मध्ये सातत्य राखत नाबाद 40 धावा केल्या. आयुष् रक्ताडे याने नाबाद 27, तर पार्थ पोतदार याने 22 धावा केल्या.
अकॅडमी ला हेमंत (अण्णा) पाटील,आमदार डॉ. विश्वजीत कदम, जेष्ठ प्रशिक्षक सागर पेंडुरकर,फिजिओ डॉ. विनय परदेशी, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.. तसेच क्रिकेट अकॅडमी चे प्रशिक्षक व संस्थापक विजय वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट अकॅडमी चे खेळाडू क्रिकेट चे धडे घेत आहेत.