डिसेंबर २०१७ रोजी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन परीक्षा (TAIT) घेतल्यानंतर तीन वर्षांचा कालावधी लोटून गेला,तरी पुन्हा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आलेली नाही.शासनाने तात्काळ याची दखल घेवून परीक्षा घ्यावी अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
शासनाच्या 'पवित्र' (PAVITRA)अध्यादेशात ही परीक्षा मागणी आणिआवश्यकतेनुसार प्रति चार महिन्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परंतू शासनाला अपल्याच अध्यादेशाचा सोयीस्कर विसर पडला.त्यामुळे डिसेंबर २०१७ नंतर तब्बल तीन वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला तरी, शिक्षक अभोयोग्यता व बुद्धिमापन परीक्षा (TAIT) आयोजित केलेली नाही.महाराष्ट्रातील जवळपास पाच लाखापेक्षा अधिक विदयार्थी या परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१७ नंतर लाखो विद्यार्थी D. ed, B.ed, CTET तसेच TET पात्र विद्यार्थी ही परिक्षा घेण्याची मागणी करीत आहेत.
तसेच टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) एक वर्षापेक्ष अधिक कालावधी लोटून गेला, तरी आयोजित करण्यात आलेली नाही. पण त्याचवेळी 'केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा' ही वर्षातून दोन वेळा जुलै आणि डिसेंबर मध्ये नियमितपणे आयोजित केली जाते. पण राज्य शासनाची टीईटी परीक्षा ही नेहमीच अधांतरी असते. कधी वर्ष, तर कधी दीड वर्षातून ही परीक्षा आयोजित केली जाते. ज्यामुळे भावी शिक्षकांना नेहमीच समस्यांचा सामना करावा लागतो. टीईटी परीक्षा सिटीइटीच्या धर्तीवर दोन वेळा आयोजित करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी सौ. सुनंदा वाखारे (प्राथमिक शिक्षणाधिकारी) तसेच श्री. सुधाकर तेलंग (माध्यमिक शिक्षणाधिकारी) याना देण्यात आले. त्याची मोठ्या संख्येने भारी शिक्षक उपस्थित होते. तसेच संगली जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब कटारे, शेतकरी संघटनेचे सुनिल फराटे, पवित्र शिक्षक संघर्ष समितीचे महा. राज्य अध्यक्ष प्रा. अर्जुन सुरपल्ली, महिला आघाडी संघटक सौ. प्रतिभा मगदूम, सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सौ. स्वप्नप्रिती जाधव, उपाध्यक्ष नेहा चिखले, सचिव स्नेहा कदम, ऐश्वर्या तेरदाळे आणि अश्विनी करांडे, तेजस्विनी माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
CTET व TET पात्र असूनही बऱ्याच उमेदवारांचे भवितव्य दुसऱ्या TAIT परिक्षेवरअवलंबून आहेआमच्यासारखे काही उमेदवार तर age bar होत आहेत.शासनाने नविन पिढी घडविणाऱ्या या उमेदवारांचे उज्ज्वल भवितव्य लक्षात घेऊन लवकरात लवकर दुसरी TAIT जाहीर करावी व सर्व b.ed,d.ed धारकांना योग्य तो न्याय द्यावा.
सौ. प्रणिता विनय उपाध्ये
गेल्या तीन वर्षांपासून टीएआयटी ही शिक्षक निवड परीक्षा घेण्यात आलेली नाही.सर्व पात्रता पूर्ण असूनही शासन ही परीक्षा आयोजित करीत नसल्याने आम्हा पात्रताधारक भावी शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.आघाडी सरकारने ही अभियोग्यता परीक्षा त्वरित जाहीर करावी,तसेच टीईटी परीक्षा देखील लवकरच घेण्यात यावी.
सौ.स्नेहा कदम
शिक्षक भरती साठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी अनिवार्य असेल तर शासनाने ही परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित करायला हवी. आम्ही परीक्षेची आतुरतेने वाट पाहत आहोत. शासनाने परीक्षा कालावधीत नियमितता जपली पाहिजे.सीटीईटी च्या धर्तीवर टीईटी परीक्षा देखील वर्षातून मार्च आणि ऑक्टोबर मध्ये नियमित घ्यायला हवी.
सौ.अश्विनी करांडे