Sanvad News कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार जाहीर.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार जाहीर.


कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य संलग्न कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सांगलीचे वतीने यावर्षी देण्यात येणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 


यामध्ये आदर्शवत शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणाऱ्या महिला शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.येत्या ३ जानेवारी२०२१ रोजी सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा मा. प्राजक्ता कोरे, सां. मि. कु. महानगरपालिकेच्या महापौर मा. गीता सुतार,महासंघ महासचिव नामदेवराव कांबळे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, प्रा. नंदा पाटील, प्रा. डॉ. माधुरी देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 


यामध्ये सेवाज्येष्ठ मुख्याध्यापिका सौ. सुनिता माने रा. स कन्या शाळा सांगली, सौ. शुभांगी मन्वाचार सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज भिलवडी, पदवीधर शिक्षिका सुरेखा राजेंद्र कासार जिल्हा परिषद शाळा नं १सावळज, सौ. स्वाती रघुनाथ बाबर आर. एम हायस्कूल मिरज, सौ. अंजुम राजमहमद मोमीन जिल्हा परिषद उर्दू शाळा, सुभाष नगर, सौ. स्मिता सुरेश पाटील न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज, सौ. आसमा ईलाही शेख जिल्हा परिषद उर्दू शाळा नं ४ बत्तीस शिराळा यांचा गौरव करण्यात येणार आहे. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात येणार आहे. 


हा पुरस्कार सोहळा आय. एम. ए हाॅल मिरज येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या पुरस्कार सोहळयास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे, महिला आघाडी प्रमुख विनोदिनी मिरजकर यांनी केले आहे.
To Top