Sanvad News वारकरी संघाच्यावतीने आमदार अरुण लाड यांचा सत्कार.

वारकरी संघाच्यावतीने आमदार अरुण लाड यांचा सत्कार.


पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा पलुस तालुका वारकरी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

त्यांना भावी काळासाठी वारकरी संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. 
यावेळी मनोगत व्यक्त करताना अरुण आण्णा लाड म्हणाले की, वारकरी संघाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. मला मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मी परत एकदा आभार मानतो. मी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत.

यावेळी बोलताना पांडुरंग कासार म्हणाले की, नवनिर्वाचित आमदार अरुण आण्णा  लाड यांनी वारकरी संघाच्या विकासासाठी नेहमीच मोलाचे योगदान दिले आहे .त्यांची सर्वतोपरी मदत नेहमीच वारकरी संघास असते.

या कार्यक्रमाला जिल्हा वारकरी संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग कासार ग्रामीण साहित्य परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती वासंती मेरु स्वामी विवेकानंद विचार मंचचे सदस्य पांडुरंग पुदाले, संजीव तोडकर ,कुमार गायकवाड भानुदास पुदाले यांची प्रमुख उपस्थिती होती.


 
To Top