Sanvad News मिरज तालुका शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक दयासागर बन्ने यांची निवड

मिरज तालुका शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक दयासागर बन्ने यांची निवड



अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ प्रणित महाराष्ट राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या  कै.आ.शिवाजीराव पाटील संघटनेच्या  मिरज तालुका प्राथमिक  शिक्षक संघाच्या अध्यक्ष पदी दयासागर बन्ने यांची निवड करण्यात आली.

आखिल भारतीय प्राथमिक.शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माधवराव पाटील,जिल्हा अध्यक्ष मुकुंद सुर्यवंशी, तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाचे  अध्यक्ष  विकास शिंदे, जिल्हा सरचिटणीस मा  सुनील गुरव, जिल्हासल्लागार नेते  सूर्यकांत पाटील, तरूण प्राथमिक शिक्षक मंडळ सरचिटणीस वसंत सावंत, जिल्हाकार्याध्यक्ष सुरेश पवार, जिल्हाकोषाध्यक्ष राजु राजे,  कायदा सल्लागार  अँड धनराज पाटील मा धनंजय पाटील   आदी पदाधिकारी यांच्या  उपस्थित सन्माननीय निवड करून बन्नेसरांचा यथोचित  सत्कार करण्यात आला. 

यावेळी  बोलताना माधवराव पाटील म्हणाले की, संघाची खूप मोठी परंपरा आहे. आण्णांनी आयुष्यभर संघ वाढीसाठी व शिक्षक प्रश्नासाठी लढा दिला. संघात काम करणारे कार्यकर्त्यांनी प्रामाणिक व संघावर निष्ठा ठेऊन, संघटनेचे घटनेनुसार काम करावे.काही विघ्नसंतोषी पदाधिकारी संघटनेची दिशाभूल करुन कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करीत असून त्यांना थारा देऊ नका असे आवाहन माधवराव पाटील यांनी यावेळी केले.

जिल्हाध्यक्ष मुकुंद सुर्यवंशी यांनी लातूर येथील महामंडळ व राज्य कार्यकारणीच्या सभेत झालेल्या   निर्णयासंबंधीची माहिती दिली.
 तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष विकास शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात दिशाभूल करणारेची टोळी कार्यरत झाली असून संधीसाधूचे मोठे  रँकेट बँक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कार्यरत आहे. त्यापासुन  संघटनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी सावध रहावे  असे आवाहन केले.

नूतन अध्यक्ष दयासागर बन्ने यांनी संघटना वाढीसाठी  सर्वतोपरी प्रयत्न करणार असे सांगितले संघर्षातुन सर्वांना बरोबर घेऊन मिरज तालुक्यात संघटना बांधणी करणार असे अभिवचन याप्रसंगी  दिले.

बैठकीत सांगली मिरज व कुपवाड  म.न.पा अध्यक्ष सुरेशराव शिंगाडे यांची बालक पालक संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या  बद्दल समस्त  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने  मान्यवरांच्या हस्ते आदर  सत्कार करण्यात आला.

या वेळी शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक  रशिद टपाल,गजानन सुतार,दरगोंड पाटील, फय्याज शेख, रामदास काकड,बाळासाहेब कांबळे,राकेश कांबळे, अशोक परिट , नेते माणिक माळी सरचिटणीस मिरज आदी पदाधिकारी,शिक्षक बांधव  उपस्थित होते. 


To Top