Sanvad News आमदार कपिल पाटील यांना शिक्षक भारती परिवाराचे निवेदन

आमदार कपिल पाटील यांना शिक्षक भारती परिवाराचे निवेदन


शिक्षक भारती परिवार पलूस तालुका यांच्या वतीने आमदार कपिल पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शिक्षक भारती परिवार सांगलीच्या वतीने आयोजित कुटुंब स्वास्थ्य आरोग्य योजनेच्या  उद्घाटन प्रसंगी आयोजित शिक्षक भारती जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. 

पलूस तालुका शिक्षक भारती परिवाराच्या वतीने महेशकुमार चौगुले( जिल्हा कार्याध्यक्ष), उदयकुमार रकटे( पलूस तालुका अध्यक्ष), मधुकर चौधरी( पलूस तालुका कार्याध्यक्ष)यांनी  पलूस पंचायत समिती शिक्षण विभागास  स्टाफिंग पँटर्न मंजूर होण्यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा करण्यासाठीचे निवेदन आमदार श्री. कपिल पाटील यांना देण्यात आले. 

यावेळी  आमदार कपिल पाटील यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी त्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर  वक्तृत्वाने संपूर्ण शिक्षक भारती परिवार भारावून गेला.
To Top