Sanvad News लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहू -आमदार मानसिंगराव नाईक; शिराळा येथे सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण.

लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहू -आमदार मानसिंगराव नाईक; शिराळा येथे सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण.


शिक्षकांना विविध पातळीवर न्याय मिळवून देणाऱ्या लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.सदगुरु आश्रमशाळा शिराळा येथील  सभागृहात शिक्षक भारती या संघटनेच्या वतीने आयोजित वाळवा-शिराळा तालुका सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
       
यापुढे बोलताना आमदार मानसिंग नाईक म्हणाले की, विधिमंडळात शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे काम निश्चितच प्रभावी आहे. विविध प्रश्न घेऊन सतत शिक्षणमंत्री व इतर मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने चालूच असते.सांगली जिल्ह्यात आम्ही सर्वजण शिक्षक भारतीच्या  पाठीशी ठामपणे राहणार आहोत.
   या कार्यक्रमास वाळवा पंचायत समिती सभापती  शुभांगी पाटील,शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने ,श्री प्रकाश पाटील,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोअर कमिटी अध्यक्ष कादर अत्तार,नेते नंदकुमार पाटील,वाळवा अध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर, शिराळा अध्यक्ष दादासाहेब खोत,सरचिटणीस सुधाकर वसगडे,कार्याध्यक्ष महेश चौगुले,कोषाध्यक्ष बालम मुल्ला सरचिटणीस अमोल जाधव,जिल्हा नेते दीपक कांबळे,अन्सारअली जमादार ,संभाजी खोत,महिला सरचिटणीस सुरेखा औताडे,केंद्रप्रमुख तानाजी माने, नजमा पिरजादे, मुख्याध्यापक सर्जेराव टकले, बाजीराव जाधव,दिगंबर सावंत, उदयकुमार रकटे,महेश टकले, नितांत तांबडे,राजू जाधव, संतोष खोत, दिलीपकुमार मोरे, सुनिल पाटील ,पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 बोलताना वाळवा तालुका पंचायत समिती सभापती सौ. शुभांगी पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कामाचे कौतुक करत  आपल्या मनोगतामध्ये इयत्ता पाचवी व आठवी ऐवजी  इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असावी  व त्यामुळे शिक्षकानाही  निश्चित ध्येय मिळेल अशी आशा व्यक्त केली. 
शिराळा तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सौ.वैशाली माने यांनी आपल्या मनोगतातून सावित्री-फातिमा यांच्या कार्याचा आढावा घेतला व शिक्षक भारतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी शिक्षक भारतीच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला व सावित्री-फातिमा कॅशलेस आरोग्य योजनेविषयी माहिती दिली. शिक्षक भारती शिक्षक बँक निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे जाहीर केले.
 जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी विषय शिक्षकवेतनश्रेणी विषयी असणारी त्रुटी व त्यावरील उपाय यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.
शिराळा तालुका अध्यक्ष  दादासाहेब खोत खोत म्हणाले की महिलांचा सन्मान या पुरस्कारद्वारे होत आहे.


वाळवा तालुका अध्यक्ष श्री.चंद्रशेखर क्षिरसागर आपल्या मनोगतात म्हणाले की,अन्यायाविरुद्ध आवाज उठणारी ही चळवळ असून  तालुक्यात व जिल्ह्यात वादळात दिवा लावण्याचे काम आमदार कपिल पाटील यांच्याप्रेरणेने आम्ही करत आहोत व शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतच राहू .
सत्कारमूर्ती यांच्यावतीने बोलताना केंद्रप्रमुख सुनंदा पाटील म्हणाल्या की, शिक्षक भारतीचे इवलेसे रोपटे  कमी काळात कामाच्या जीवावर जिल्ह्यात व राज्यात विविध क्षेत्रात भरारी घेत असून लवकरच त्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.आम्हा सर्वांना पुरस्कार देऊन प्रेरणा मिळाली आहे.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीरंग गायकवाड ,सौ सुवर्णा बच्चे, अनिता कदम व सौ. सुप्रिया घोरपडे यांनी केले.आभार अमोल जाधव यांनी मानले.
शिक्षक भारतीने केलेल्या सन्मानाने  भावुक झालेल्या भगिनीनि आयुष्याचे सार्थक  झाल्याचे बोलून दाखवले.काहीना तर आनंदाश्रू रोखता आले नाहीत.
To Top