सांगली जिल्हा परिषदेच्या शाळा आदर्श माॅडेल स्कूल करण्यासाठी शिक्षक समीतीचे सभासद, पदाधिकारी सक्रिय सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण समिती सदस्य बाबासाहेब लाड यांनी सांगितले.
सांगली येथे आयोजित शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी कार्याध्यक्ष किरण गायकवाड, राज्य संघटक सयाजी पाटील, शिक्षक बॅ॑केचे चेअरमन सुनिल गुरव, व्हा.चेअरमन महादेव माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील एक अशा जिल्हा परिषदेच्या १३७ आदर्श माॅडेल शाळा करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये शिक्षक समितीचे सभासद, पदाधिकारी झोकून काम करणार असल्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत जिल्हा परिषदेच्या शाळाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत नवनवीन उपक्रम राबविले जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट होत आहे या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता खाजगी शाळापेक्षा चांगली आहे. खाजगी शाळांमध्ये शिक्षणासाठी फी आकारणी करतात जिल्हा परिषद शाळेत मोफत गुणवत्ता पूर्ण शिक्षण असून ही काही भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने पालक पाल्यांना खाजगी शाळांमध्ये शिक्षणासाठी पाठवतात त्या सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मदतीने शिक्षण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर,शाहू, फुले हाॅस्पिटलचे सल्लागार चेअरमन,सोनी केंद्राचे केंद्रप्रमुख अविनाश जकाते यांचा सेवा समाप्ती पूर्ती सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षक संघ थोरात गटाचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दळवी यांनी शिक्षक समिती जाहीर प्रवेश केल्याबद्दल विश्वनाथ मिरजकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थित यथोचित सन्मान करण्यात आला. कोरोना काळातही प्रशासकीय कामकाजात शिक्षकांचे योगदानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घर भेटी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षक, शिक्षिका तसेच गुणवंत विद्यार्थी करणाऱ्याचा गौरव शिक्षक समितीच्यावतीने केला असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी मनोगतातून व्यक्त केले.
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी.जाधव, कार्याध्यक्ष सतिश पाटील, सरचिटणीस दयानंद मोरे, माणिक पाटील, भास्कर डिगोळे, सुरेश पाटील, शिवाजी पवार, सुरेश नरुटे, संजय शिंदे, धरेप्पा कट्टीमणी, आदींनी समायोचित मनोगत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू, फुले हाॅस्पिटल चेअरमन राजेंद्र कांबळे, कार्यकारी संचालक तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, राजाराम सावंत, बाळासाहेब आडके, श्रेणिक चौगुले, ताजुद्दीन मुलाणी, डी.बी. माळी, मल्लीकार्जुन बालगांव, मंगेश बनसोडे, राजाराम शिंदे, आत्माराम मोहिते, बाजीराव सावंत, संदिप कांबळे तसेच तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी उपस्थित होते.