Sanvad News वसुंधरेच्या संवर्धनासाठी विष्णू दिगंबर पलूसकरचे विद्यार्थी सरसावले;वसुंधरा शपथ उपक्रमाचे आयोजन.

वसुंधरेच्या संवर्धनासाठी विष्णू दिगंबर पलूसकरचे विद्यार्थी सरसावले;वसुंधरा शपथ उपक्रमाचे आयोजन.


पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात माझी वसुंधरा शपथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे ,पलूस नगर परिषदेचे अधिकारी अमित शिंदे, लक्ष्मण राठोड, सौ.अलका बागल , जेष्ट शिक्षक ए.जे. सावंत ,अनिल बामणे सर, विकास गुरव ,सर्व शिक्षक ,शिक्षिका ,इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी. चोपडे यांनी सर्व शिक्षकांना,विद्यार्थ्यांना शपथ दिली.


निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्चावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण याबाबत काम करणे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायु प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधार करणे. नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे.ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक ऊर्जेच्या निमिर्तीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात जनजागृती करणे, या बाबींचा समावेश आहे.


निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. निसर्गाशी संबाधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपुरक जीवनपद्धती अवलंबण्यासाठी माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे.


नवीन वर्षात पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यातील नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची किमान एक तरी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीस प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
To Top