भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने भिलवडी गावात दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी'दारू नको दूध प्या' हे व्यसनमुक्ती चे अभियान राबविण्यात येते.यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे अभियान ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ.ईश्वर पवार (सी.टी.बोरा काॅलेज शिरूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्यसनी माणूस हा समाजाचा व कुटुंबीयांचा शत्रू आहे.महाविद्यालयीन युवकांनी व्यसनापासून चार हात दूर थांबावे.व्यसन मुक्ती हा केवळ स्टेजवर भाषण करण्याचा विषय नसून त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करणे काळजी गरज आहे.बाबासाहेब चितळे महाविद्यालय गेली बावीस तेवीस वर्षे दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवित आहे..तो कौतुकास्पद असून शाळा महाविद्यालयांनी त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना व्याख्यानाव्दारे व्यसनमुक्ती बद्दल प्रबोधन करण्यात आले.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश शिंदे तसेच संचालक मंडळाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे एन.एन.एस.विभागप्रमुख प्रा.डाॅ.विजय गाडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने ऑनलाईन उपस्थिती राहून या उपक्रमात सहभाग घेतला व नववर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प सर्वांनी केला.