Sanvad News माध्यमिक विद्यालय नागठाणे मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरा.

माध्यमिक विद्यालय नागठाणे मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरा.


 माध्यमिक विद्यालय नागठाणे येथे  रविवार दि. 03|01|2021 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांच्या धडाडीच्या कार्यकरत्या श्रीमती मनिषा 
घोलप मॅडम उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून अन्नुबुवा येडेकर विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.साळुंखे एस्.वाय.मॅडम व विद्यालयाच्या माजी शिक्षिका सौ.अनुपमा थोरात
 मॅडम उपस्थित होत्या. 
      मनिषा घोलप यांनी आपल्या भाषणात समाजातील अनिष्ट रुढी या विरुद्ध स्त्रीशिक्षणाचे कार्य याचे महत्व विशद केले.तसेच सौ.साळुंखे मॅडम यांनीआपल्या भाषणात ज्यांच्याजवळ ज्ञान नाही त्यांना मानव म्हणावे का? असे सांगितले. सौ.थोरात मॅडम 
या म्हणाल्या की आजची स्त्री सावित्रीबाईंच्या कार्यामुळे पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करते.या कार्यक्रमाला इ.9 वी व इ.10 वी
चे विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी मनिषा घोलप मॅडम यांनी विद्यार्थ्यांनापेन वाटप करून कार्यक्रमाची सांगता 
झाली .
To Top