भिलवडी शिक्षण संस्थेस सुशिला गुजर व सुमन शेटे यांचेकडून संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे यांचेकडे देणगी सुपूर्द केली.
कै.वसंत शंकर गुजर यांचे स्मरणार्थ सुशिला वसंत गुजर यांनी २१००० रुपये तसेच कै.शंकर शिवाप्पा गुजर यांचे स्मरणार्थ सुमन श्रीरंग शेटे यांनी २५००० रुपये देणगी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. विश्वास चितळे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक के.डी.पाटील यांनी केले. सुशिला गुजर तसेच स्वाती कोले यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ. सुनील वाळवेकर यांनी संस्थेस दिलेल्या देणगीबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.मोरे यानी व आभार मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी व्यक्त केले . कार्यक्रमास भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री गिरीश चितळे ,डी.के.किणीकर, आजिव सदस्य एम.आर.पाटील , व्हि.एस.तेली, सौ.एम.बी.पाटील तसेच गुजर कुटुंबीय व शेटे कुटुंबीय उपस्थित होते.