चांगल्या शिक्षणातूनच चांगला माणूस घडेल,त्यासाठी स्वकर्तृत्वावर स्वतःचा विश्वास असणे फार महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्रा. तौहीद मुजावर यांनी केले.
पलूस मदरसा डॉ.झाकिर हुसेन हायस्कूल पलूस मध्ये ७२व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन व करिअर गाइडन्स प्रोग्राम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. विद्यालयाच्या क्रीडांगणावर प्रा. तौहीद मुजावर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी १० वी,१२ वी पास,नापास , पदवीधर,डिप्लोमा धारक युवक, युवतींसाठी करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रा. तौहीद मुजावर यांनी उपस्थितांना आजच्या युगामध्ये सर्व शैक्षणिक स्तरावरील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत याबद्दल फार मोलाचे मौखिक व प्रोजेक्टर द्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व मान्यवरांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी कारी बदिउज्जमा साहब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन रामानंदनगरचे प्रसिद्ध उद्योजक श्री. नसीर मुल्ला व मोहंमदिया मस्जिद तासगांव चे इमाम व खतिब हाफीज अय्याज मोमीन हे उपस्थित होते. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक ज. आलीम शेख सर यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज.आरीफ लतीफ सर यांनी केले तर आभार ज. समीर आगा सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, असातिजा, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.