Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात


सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
द्राक्षगुरू वसंत माळी (सर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली.
संस्थेचे अध्यक्ष सुनिल (बापू)जाधव,कार्यवाह सौ.वनिता जाधव,अर्जुन जाधव,राजेश चव्हाण,सुनिल माळी,संतोष सूर्यवंशी,विनोद पाणबुडे आदी मान्यवरांसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा चौंदिकर यांनी केले.
To Top