Sanvad News शुभांगी मन्वाचार आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.

शुभांगी मन्वाचार आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित.


कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज भिलवडीच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांना प्रदान करण्यात आला. 
 प्रसिद्ध साहित्यिक नंदा पाटील,महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी,विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
अनेक वर्षे केलेल्या शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, विविध राबविण्यात आलेले उपक्रम, शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.यावेळी बोलताना या पुरस्काराने नव उर्जा मिळाली आहे, याचा उपयोग विद्यार्थी विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी असल्याचे मनोगत शुभांगी मन्वाचार यांनी व्यक्त केले.  सदर पुरस्काराबद्दल शुभांगी मन्वाचार यांचा विद्यालयाचे वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
To Top