इस्लामपूर येथील प्रकाश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रकाश पब्लिक स्कूल,प्रकाश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रशासिका सौ.सुनिता निशिकांत भोसले पाटील (वहिनी साहेब) यांच्या हस्ते, प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सौ. सुनीता निशिकांत भोसले पाटील (वहिनीसाहेब) म्हणाल्या की,स्वामी विवेकानंद जंयती ही राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते.आजच्या युवा पिढी पर्यंत स्वामी विवेकानंदाचे विचार पोहचवणे आवश्यक आहे व युवा पिढीने त्यानुसार आचरण करणे आवश्यक आहे.बदलत्या काळात तरूण पिढी ने राजमाता जिजाऊ चे चरित्र वाचणे आवश्यक आहे. राजमाता जिजाऊ मुळेच आज आपल्या महाराष्ट्रास छत्रपती शिवाजी महाराज लाभले व हे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.अश्या या राजमातेचे स्मरण फक्त जंयती पुरते न ठेवता कायमस्वरूपी ठेवले पाहिजे.
यानंतर प्रकाश पब्लिक स्कूल चे प्राचार्य डॉ.मधुकर नायर सरांनी आपल्या मनोगता मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली.
यावेळी प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत देसाई सर व प्रकाश माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सिंधू नायर उपस्थित होत्या.कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.सुनिता माने मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. तब्बसुम पटेल मॅडम यांनी केले.