महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कवठेमहांकाळ शाखेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.शिक्षक नेते विश्वनाथ आण्णा मिरजकर यांच्या अध्यक्षतेखाली महांकाली मंगल कार्यालय कवठेमहांकाळ येथे भव्य नेत्रदिपक असा शिक्षक मेळावा संपन्न झाला.आमदार सुमनताई पाटील,सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षासौ.प्राजक्ता कोरे,शिक्षण सभापती आशाताई पाटील,सभापती विकास हाके, राज्यनेते किरण गायकवाड आदिसंह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की,शिक्षक समिती ही निरपेक्षपणे शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे.शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपण शासन पातळीवर प्रयत्नशील राहू.
शिक्षक समिती ही संघर्ष करणारी संघटना आहे.विद्यार्थी,शिक्षण व शिक्षकासाठी कटिबद्ध असणारी संघटना म्हणजे शिक्षक समिती. शिक्षकांच्यावर होणाऱ्या अन्यायावर शेवटपर्यंत लढा चालूच ठेवणार,जुनी पेन्शनसाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी केले.
यावेळी यु.टी.जाधव,बाबासाहेब लाड,सयाजीराव पाटील,किरणराव गायकवाड,सभापती विकास हाक्के,शिक्षण सभापती आशाताई पाटील,जि.प.अध्यक्ष प्राजक्ता कोरे आदींनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्रांतीज्योती सावित्री बाई फुले पुरस्कारप्राप्त शिक्षिक भगिनी -
छाया कुंभार, सुनंदा गडदे,कालिंदी शिंदे,भारती भोईटे,वर्षा सातपुते,निगरबी मुल्ला,कुसुमताई जगताप,वर्षाराणी पाटील,सविता चौगुले,सुवर्णा पाटील,मंगल माळी,अलका गायकवाड ,सुजाता वांडरे,रिटा कांबळे,मनिषा कांबळे,नंदा शिनगारे,संजीवनी बहाद्दुरे,विजया कुंभार,जोती माने,आक्काताई , लाटवडे,वर्षा चव्हाण,वसुधा आंबे,सविता वाघमारे,सुनिता माने,रुक्मिनी पाटोळे,अतिया कौसर मुजावर,लतिका कवठेकर,प्रभावती बाड,अलमास मणेर,दिपिका कापसे,कविता पाटील,मनिषा फोंडे,नंदा जाधव,दिपाली खडके,तृप्ती कमलाकर,अर्चना माने.
क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्कार प्राप्त शिक्षक बांधव -
हणमंत पाटील,तात्या खोत,सुनिल बाबर,अमोल पवार,तानाजी पाटील,श्रीकृष्ण लोंढे,उत्तम मोटे,किरण कुंभार,नवनाथ शिंदे,पांडुरंग जाधव,सुरगोंडा पाटील,भाऊसाहेब भोसले,शितल माळी.
विशेष गुणगौरव पुरस्कार प्राप्त गुरुजन..
राजश्री पाटील( क्रीडा),अमोल हंकारे(तंत्रज्ञान),
विनोदकुमार पाटील(शै.साहित्य व क्रीडा),किरण पाटील(क्रीडा),नारायणपवार(क्रीडा),दिपकलिमकर(शैक्षणिकसाहित्य),शुंभागीघाटे(उत्कृष्टनिवेदिका),नंदकुमार गायकवाड(क्रीडा),
गणेशकाकडे(NETउत्तीर्ण),प्रमोदपवार(शैक्षणिककामकाज),गोविंदखोत(शैक्षणिक कामकाज),सुलक्षणा अलदार(शैक्षणिक साहित्य).
या बरोबरच ५२ शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदरमेळावा यशस्वी करणेसाठी,मनोज कोळेकर,रावसाहेब देवमाने,सदानंद सणगर, विजय पाटोळे, निलेश खडके,नंदकुमार चव्हाण,किरण सातपुते,बाळासो बंडगर,दिलीप कोळेकर,रंजना शेळके,गुणवंता खोत,सुलक्षणा अलदार ,राधिका खोत,शुभांगी घाटे यांचेसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्वागत विनोदकुमार पाटील यांनी,प्रास्ताविक शशिकांत बजबळे यांनी तर आभार बाळासाहेब बंडगर यांनी मानले.