सांगली-अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ, शाखा सांगलीच्यावतीने आयोजित वार्षिक संमेलनामध्ये गतवर्षात साहित्यकृती प्रकाशित करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन 2020 हे वर्ष अनेक कारणांनी आव्हानात्मक होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकतेने साहित्य सेवा करणाऱ्या शिक्षकांचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे असे उद्गगार गौरव सोहळ्याचे अध्यक्ष प्रा गोपाळ कबनूरकर यांनी काढले.
यावेळी सौ. सुधा राजेंद्र पाटील लिखित - घुसमट आणि परिभाषा प्रेमाची ( नाटक ) ;
श्री मच्छिंद्र ऐनापुरे लिखित -रहस्यमयी अंगठी,माकडाचा पराक्रम,गोष्टी स्मार्ट बालचमूंच्या(कथासंग्रह);सौ.मंदाकिनी सपकाळ लिखित- लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जीवन आणि कार्य(चरित्र);
श्री सचिन कुसनाळेलिखित-
स्वातंत्र्यायण(वैचारिक) या पुस्तकांचा समावेश आहे. संमेलनाचे उद्घाटन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री नटराज मोरे यांनी केले. संमेलनाध्यक्ष डॉ अजित पाटील हे होते.स्वागताध्यक्ष राज्यकार्यकारिणी सदस्य श्री सचिन कुसनाळे हे होते.
संमेलनास साहित्यिक श्री विजय जंगम,श्री मुबारक उमराणी, श्री अरुण कांबळे,श्री विजय दळवी यांसह अनेक साहित्यिक उपस्थित होते.