जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने धैर्यशील उर्फ शंभूराजे पाटील यांच्या उपस्थितीत नुकताच शिराळा दौरा करण्यात आला. देववाडी गावातील तमाम शिक्षकांच्या वतीने देववाडी येथील जिल्हा संघाचे नूतन कार्याध्यक्ष आदरणीय दिलीपराव खोत (सावकर) यांच्या सह नूतन जिल्हा पदाधिकारी यांच्या भव्य सत्काराचे नियोजन करण्यात आले होते.
या सत्कारप्रसंगी देववाडी गावातील सर्व शिक्षक तसेच शिराळा तालुका शिक्षक संघाचे व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिराळा तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबासाहेब वरेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सर्वच सत्कारमूर्ती यांचा सत्कार पार पडले.
शिक्षक संघाच्या वतीने मनोगत व्यक्त करताना अखिल भारतीय जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंभूराजे उर्फ धैर्यशील पाटील यांनी शिक्षक संघाची परंपरा,आदरणीय शि.द.आण्णा यांच्या कार्याच्या आठवणी सांगून देववाडीकरांनी शिक्षक संघाला प्रत्येक वेळी मोठ्या ताकतीने साथ दिली आहे व येणाऱ्या काळात सुद्धा देववाडी मधील तमाम शिक्षकांनी शिक्षक संघाला साथ द्यावी असे आवाहन केले.
दिलीपराव खोत (सावकर) यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची झालेली निवड ही सर्वांच्या संमतीने व तालुका अध्यक्षांच्या एक मुखी पाठिंब्याने झाली असून तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटेल असे काम या नूतन जिल्हा टीमच्या हातून घडेल अशी ग्वाही धैर्यशील पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना दिली, तसेच देववाडी गावातील शिक्षकांची एकी पाहून त्यांनी या गावातील शिक्षकांचा आदर्श जिल्ह्यानेच नाही तर राज्याने ही घ्यावा अशी अशा व्यक्त करून भविष्यकाळात शिक्षक संघाला अशीच एकीने साथ दिलात तर नक्कीच आणखी सन्मानाचे व जबाबदारीचे पद देववाडीला दिले जाईल असे वचनही दिल.
अण्णांनी कार्यक्रमानिमित्त देववाडीत याव शिक्षकांशी हितगूज करावं ही देववाडी करांची इच्छा अण्णांच्या पश्चात त्यांचे नातू युवा नेतृत्व धैर्यशील पाटील यांनी पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव खोत (सावकर) यांनी व्यक्त केले.
नूतन जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी सत्कारास उत्तर देताना देववाडीकरांच्या ऋणात राहायला आवडेल ,आपण केलेल्या सत्काराने काम करायला अधिक प्रेरणा मिळाली असून येणाऱ्या काळात देववाडी मधील शिक्षकांचे जिल्हा,तालुका तसेच राज्यस्तरावर जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून संघटना वाढीसाठी व बळकट करणेसाठी साथ देण्याचे आवाहन केले.
नूतन जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे यांनी सत्काराला उत्तर देताना देववाडीकर हे वारणेच्या पाण्याप्रमाणेच निर्मळ आणि स्वच्छ मनाचे असून स्वभावाने गोड असल्याचे मत व्यक्त केले.देववाडीतील शिक्षकांनी एकत्र येऊन केलेल्या सामाजिक कार्याचेही कौतुक केले व येणाऱ्या काळात संघटनेच्या कार्यात देववाडीकरांचे वर्चस्व राहील तसेच एकीचे बळ टिकवून ठेवल्यास सर्वच समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिराळा तालुका अध्यक्ष प्रताप गायकवाड (नाना) ,सरचिटणीस सत्यजित यादव, कार्याध्यक्ष बाबासाहेब वरेकर ,वाळवा तालुका सरचिटणीस संभाजी ठोंबरे ,तसेच महादेव परिट सर,श्री धोंडीराम शिंदे सर,श्री महादेव खोत सर,श्री प्रवीण खोत सर,श्री बाबा वरेकर सर ,श्री संतोष खोत सर ,श्री राजपूत सर,श्री काशीनाथ खोत सर ,श्री आनंदराव वरेकर सर ,श्री विलास खोत सर ,श्री महिपती खोत सर ,श्री संभाजी खोत सर ,श्री संजय खोत सर , श्री उदय चव्हाण सर यांच्या सह अनेक शिक्षक बंधू उपस्थित होते.