पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था पलूस येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुण्या म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सौ.सारिका दरेकर ,सौ.रुपा सुतार,माजी विद्यार्थिनी डाँ.धनश्री बागल,मुख्याध्यापक टी.जे. करांडे ,मोहन सुतार,सौ.कुलकर्णी मँडम,जेष्ट शिक्षिका सौ.प्रिती नरुले, सौ.अलका बागल, ,सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.के. बामणे,बी.डी. चोपडे, सर्व शिक्षक, शिक्षिका प्रमुख उपस्थित होते,यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांचे स्वागत- प्रास्ताविक सौ.अलका बागल परिचय सौ.स्मिता सांळुखे यांनी करुन दिला .कोरोना काळात काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने वक्तृत्व,निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक टी.जे.करांडे, डाँ.धनश्री बागल,सौ.रुपा सुतार मँडम,सौ.सारिका दरेकर कु.प्रियांका गावडे, कु,समृद्धी चव्हाण , कु.शितल माने,कु. वैष्णवी पाटील,कु.पौर्णिमा हेगडे,कु. मयुरी सुतार सौ.के.टी.कदम ,अनिल बामणे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला .आभार सौ. सुप्रिया चव्हाण यांनी मानले.सूत्रसंचालन सौ.प्रिती नरुले यांनी केले.
सौ.सारिका दरेकर म्हणाल्या भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी सामाजिक सुधारणांचे नवे पर्व सुरू केले. भारतातील सामाजिक जागृतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संविधानासाठी आवश्यक अशा लोकशाही मूल्यांच्या स्थापनेसाठी अविरत संघर्ष आणि समर्पणही केले.
मुख्याध्यापक टी.जे.करांडे म्हणाले समग्र परिवर्तनाचा आधार शिक्षण हाच आहे, शिक्षणाने माणूस बदलतो, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा मानवी अधिकार आहे, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. सर्वांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण द्या, असा आग्रह महात्मा फुले यांनी त्या काळात धरला होता.
सौ.रुपा सुतार म्हणाल्या भारतात आज सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचे प्रवर्तक म्हणून महात्मा फुले यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.सौ.के.टी.कदम म्हणाल्या महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा गरीब माणसांच्या दारापर्यंत पोहोचवली. पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खूप मोलाची साथ दिली. डॉ.धनश्री बागल म्हणाल्या विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलाच, पण शिक्षणाची गंगाही खुली केली,