क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल ता.पलूस येथील पै.श्रीवर्धन श्रीरंग पाटील व पै. हर्षवर्धन विजय मोहिते या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे.
असोसिएशन फॉर ट्रॅडिशनल यूथ गेम्स अँड स्पोर्ट्स इंडिया यांच्या वतीने सौराष्ट्र युनिव्हर्सिटी राजकोट गुजरात या ठिकाणी दि. 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेसाठी देशाच्या काना कोपऱ्यातून पैलवान हजर होते. वेगवेगळ्या राउंड मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक फेरीगणिक उठावदार व चमकदार कामगिरी करत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल च्या पै .श्रीवर्धन श्रीरंग पाटील व पै. हर्षवर्धन विजय मोहिते यांनी सुवर्णपदक पटकावले.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड, मुख्याध्यापक अनिल लाड, क्रीडा शिक्षक आनंद साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.