Sanvad News प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक संघाने घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट;प्रलंबित प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन.

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक संघाने घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट;प्रलंबित प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन.


प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक संघाने
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितेंद्र डूडी यांची भेट घेतली.सर्व प्रलंबित प्रश्न निकालात काढू असे आश्वासन मुख्यकार्कारी अधिकारी यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटावेत यासाठी शिक्षक संघ सातत्याने प्रयत्नशील असतो. शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाने नुकतीच बारामती येथे खासदार मा. शरदचंद्रजी पवार यांची तसेच कोल्हापूर येथे ग्राम विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेतली होती.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.जितेंद्र डूडी साहेब यांच्या सोबत शिक्षक संघाची सविस्तर चर्चा व बैठक झाली. त्यामध्ये खालील प्रश्नांवर चर्चा झाली.
१) सन २०१४ मध्ये नेमलेल्या पदवीधर विषय शिक्षकांना जिल्ह्यामध्ये अद्याप पदवीधर वेतनश्रेणी देण्यात आलेली नाही इतर जिल्ह्यात प्रमाणे सर्व पदवीधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात यावी, यावेळी १००% विषय शिक्षकांना तात्काळ पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे ठरले.
२) ज्या विषय शिक्षकांना पदावनतीची (रिव्हर्शन) आवश्‍यकता आहे अशा सर्व प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी.
३) निवडश्रेणीची यादी तात्काळ मंजूर करण्यात यावी.
४) परिविक्षाधीन कालावधी, स्थायित्व (कायम) प्रमाणपत्र यासंबंधीचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्‍यात यावेत. तसेच शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीतील कर्ज प्रकरणे, गट विमा, पेन्शन प्रस्ताव यातील पेंडन्सी दूर करावी.
५)प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेवर करावेत यावर सविस्तर चर्चा होऊन इथून पुढे पगार बिलाचे कार्यालयीन कामकाज सुसूत्र व सुलभ व्हावे यासाठी कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले.
६) तसेच जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ शासनाने ११ ते २ अशी निर्धारित केलेली असताना फक्त सांगली जिल्हा परिषदेमध्येच ५ वाजेपर्यंत शिक्षकांना थांबवण्याचा आग्रह धरला जात असल्याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले याबाबत सविस्तर चर्चा होऊन लवकरच शाळेची वेळ बदलण्यात येईल असे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी शिक्षणाधिकारी मा. श्री.राहुल गावडे साहेब यांनी दिले.
सदर शिष्टमंडळाला मध्ये सांगली जिल्ह्याचे शिक्षक संघाचे धडाडीचे अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, जिल्ह्याचे सरचिटणीस श्री. अविनाश गुरव, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य श्री. फत्तु नदाफ, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. सलीम मुल्ला, शिक्षक बँकेचे संचालक श्री. सुधाकर पाटील, तालुका अध्यक्ष शब्बीर तांबोळी, नितीन चव्हाण तसेच मौलाली शेख, विजय केदार यांच्यासह शिक्षक संघाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
To Top