Sanvad News जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी वर्गाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली

जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी वर्गाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलली


सांगली जिल्यातील केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी इयत्ता सहावीच्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रिया काही तांत्रिक कारणासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालय विद्यालय पलूस चे प्राचार्य सुनीलकुमार नल्लाथ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता  सहावी साठी 80 
जागांसाठी  16 मे 2021 रोजी प्रवेश परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले होते.परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा अनिश्चित काळा साठी पुढे ढकलण्यात अली असून या नंतर परीक्षेची तारीख परिक्षे अगोदर 15 दिवस अगोदर जाहीर करण्यात येईल.
परिक्षेबाबत माहिती विद्यालयाच्या वेबसाईटवर पहावी असे प्राचार्य सुनीलकुमार नल्लाथ यांनी सांगितले आहे.परिक्षेबाबत माहिती पुढील वेबसाईटवर मिळेल. 
तरी संबंधीत परीक्षार्थीनी यांचे पालकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले.

To Top