भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य आदरणीय डॉ.एम.आर.पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.व्ही.एस.विनोदकर यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, डॉ.बाबासाहेब ग्रंथप्रेमी, समाजसुधारक होते.भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे.डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला विचाराचा वारसा सर्वांनी जोपासणे गरजेचे आहे.
ग्रंथालय परिचर श्री.संजय तावदर यांनी आभार मानले.समारंभाचे नियोजन श्री.सतीश मद्धाण्णा यांनी केले.याप्रसंगीप्रा.व्ही.एस.यादव,प्रा.एस.एन.खोत,प्रा.डी.एस.मोकाशी,श्री.जाधव सर प्रशासकीय बंधू श्री.सुरेश धोतरे, विजय मोरे.जी.एम.पुरीबुवा, वैभव सर उपस्थित होते.