महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली व ई- स्कूल टाईम्स यांच्यावतीने व खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी, जिल्हा - सांगली यांच्या सौजन्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा -२०२१ चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उपक्रमाचे संयोजक शरद जाधव यांनी दिली.
शाळा बंद ऑनलाईन शिक्षण सुरू या अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला.TheSharadShow या YouTube चैनल वरुन गोष्टींचे ५२ भाग प्रसारित करण्यात आले.त्यास राज्यभरातील विविध माध्यमांच्या शाळेतील शिक्षक,विद्यार्थी वर्गाकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. पुढे ही हा उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहे.
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांसाठी सूचना..
१.
या युट्यूब चॅनेल वरील गोष्टी पाहा,ऐका.त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका गोष्टीवर प्रसंग चित्र रेखाटून ते रंगवायचे.
२.कागदाच्या उजव्या कोपऱ्यात विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव,सध्याची इयत्ता,शाळेचे नाव,गोष्टीचा क्रमांक व नाव आदी बाबी सुंदर हस्ताक्षरात लिहाव्यात.(बातमीच्या सुरूवातील नमुना चित्र आहे.)
३.सदर चित्राचा मोबाईल वर फोटो काढा व
या लिंकवरून फॉर्मद्वारे आम्हाला पाठवा.
४.या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन पद्धतीने डिजिटल प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक व इंग्लिश भाषेत भरावी.
५.इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
६.दिनांक २५ एप्रिल २०२१ पर्यंत विद्यार्थ्यांनी आपली चित्रे पाठवावीत.
७. सदर स्पर्धेचा निकाल १ मे रोजी लाईव्ह पद्धतीने जाहीर करण्यात येईल.
८.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येईल.
भविष्यात गोष्टींची शाळा या उपक्रमावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून त्याबाबत वेळोवेळी सूचना कळविण्यात येतील.या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.