Sanvad News पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लागली लॉटरी; परीक्षे शिवाय होणार वर्गोंन्नत्ती-शिक्षणविभागाचा निर्णय

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लागली लॉटरी; परीक्षे शिवाय होणार वर्गोंन्नत्ती-शिक्षणविभागाचा निर्णय


कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाच्या सन २०२० -२०२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता पुढील वर्गामध्ये वर्गोंन्नती देण्यात  येणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे गेली दोन वर्षे परीक्षा न देता पुढील वर्गात जाण्याची जणू लॉटरीचं विद्यार्थ्यांना लागली आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,आर. टी. ई. अँक्ट २००९ नुसार इयत्ता १ ली ते ८ वी.हा मोफत व सक्तीचा शैक्षणिक गट आहे.कोरोणाच्या कालावधीत शाळा व शिक्षकांनी ऑनलाईन, यूट्यूब,व्हॉटसअप अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले.त्यास उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.पण सर्वच विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध होऊ शकत नाहीत.राज्यात ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करून ऑफलाईन पद्धतीने शिक्षण ही देण्यात आले.पण ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सुरू असलेल्या शाळा ही बंद ठेवाव्या लागल्या.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,त्यापासून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी भविष्यात घ्यावी लागणार आहे.शैक्षणिक वर्षे संपत आले तरीही राज्यातील सर्वच विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत.तसेच अभ्यासक्रम ही पूर्ण होऊ शकला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कामकाजाचे मूल्यमापन करता येत नाही.
तेव्हा इयता १ ली ते ८ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या सरसकट विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यात येणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची  माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
To Top