लोकमत बाल विकास मंच आयोजित आयुसास नेचर का सुपरहिरो विज्ञान प्रदर्शना मध्ये कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाचे यश संपादन करून क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल कुंडल ने नेचर का सुपर हिरो बहुमान प्राप्त केला.या स्पर्धेमध्ये सांगली,सातारा कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील 4500 विद्यार्थी सहभागी झाले.
आपल्या परिसरातील झाडांच्या संबंधित माहिती गोळा करणे, त्या झाडाचे महत्व,झाडाचे उपयोग त्यांची निगा कशी राखावी या विषयी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्प सादर करावयाचा होता.क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सागवान या झाडा विषयी इत्यंभूत माहिती शेतकऱ्यांच्या बंधावरती जाऊन संकलित केली.विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट साठी Significance of take Tree हा विषय निवडून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
विद्यालयातीलधीरजखारगे,शिवराजआवटे,अभिजितदेशमुख,प्रतीकपाटील,आदित्यचव्हाण,समर्थडफळापूरकर हे विद्यार्थी आयुसास नेचर के सुपरहीरोज ठरले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्याचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक अनिल लाड सर व विषय शिक्षिका सौ.आर.एस.मोहिते मॅडम व बाल विकास मंच समन्वयक,सर्व शिक्षक उपस्थित होते.