भिलवडी शिक्षण संस्थेच्या भिलवडी ता.पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात शासन निर्णय नुसार शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य डॉ.महेश पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' ही ध्वनीपिती लावून महाराजानां विनम्र अभिवादन करणेत आले.यावेळी बोलताना छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव शब्दरूपात डॉ.महेश पाटील व प्रा.विश्वास यादव यांनी केला.या वेळी मराठी विषयाचे प्रा.डॉ.एस.डी.कदम, अर्थशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.व्ही.एस.विनोदकर, शास्त्र विभागाचे प्रा.डी.एस.मोकाशी, प्रशासकीय अधिकारी श्री.सतीश पोतदार तसेच सर्व प्रशासकीय बंधू उपस्थित होते.