Sanvad News सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य - प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे;कृष्णाकाठ डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन ग्रेटभेट

सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य - प्राचार्य डॉ.डी.जी.कणसे;कृष्णाकाठ डिजिटल व्यासपीठावर ऑनलाईन ग्रेटभेट


आजचे युग हे आव्हानात्मक युग आहे.यामध्ये धेय्याधिष्टीत विद्यार्थीच टिकतील.स्वप्रयत्न व सातत्यपूर्ण कष्टातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य आहे असे प्रतिपादन भारती विद्यापीठ संचलित डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय,सांगली चे प्राचार्य डॉ.डॉ.जी.कणसे यांनी व्यक्त केले.कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी (सांगली) यांच्या वतीने आयोजित ग्रेट भेट या लाईव्ह कार्यक्रमामध्ये बोलत होते.
        कृष्णाकाठावरील  युवाशक्‍तीचा विधायक कार्यासाठी वापर करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधणे, या उद्देशाने ‘कृष्णाकाठ सोशल फौंडेशन, भिलवडी-सांगली’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे.  विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाची प्रेरणा लाभावी व मार्गदर्शन घडवून आणण्याच्या उद्देशाने  “ग्रेट भेट”  या ऑनलाईन उपक्रमामधे शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमशील व शिवाजी विद्यापीठ प्रथम गुणवंत प्राचार्य पुरस्कार प्राप्त मा.डॉ.डी.जी.कणसे (सर) यांची मुलाखत घेण्यात आली.सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व निवेदक  विठ्ठल मोहिते सरांच्या अमोघ संवादशैलीतूनही प्रकट मुलाखत उत्तरोत्तर खुलतच गेली.
डॉ.पतंगराव कदम साहेब यांचे भारती विद्यापीठ व सामाजिक क्षेत्रातील दैदिप्यमान कार्य आपल्या वाटचालीत प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले. याच सोबत ना.डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ते  देतील ती सर्व जबाबदारी अधिकाधिक ताकतीने पार पडण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आपण तयार असणे गरजेचे आहे असे सांगितले.
विठ्ठल मोहिते यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून उलगडलेला प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी असा ठरला.अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाकरिता प्राथमिक ते उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आभासी माध्यमांद्वारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  संस्थेचे संचालक शरद जाधव यांनी केले तर कृष्णाकाठचे अध्यक्ष प्रा.अमोल वंडे यांनी आभार व्यक्त केले.
To Top