Sanvad News सेकंडरी स्कूल भिलवडी येथील बारा खेळाडूंना जिल्हा परिषदेचे प्रोत्साहन अनुदान;सुरेंद्र वाळवेकर यांचे विशेष प्रयत्न.

सेकंडरी स्कूल भिलवडी येथील बारा खेळाडूंना जिल्हा परिषदेचे प्रोत्साहन अनुदान;सुरेंद्र वाळवेकर यांचे विशेष प्रयत्न.


सांगली जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नातून भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल भिलवडी मधील व्हॉलीबॉल आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या बारा विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयाचे अनुदान प्रदान करण्यात आले.
सांगली जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागाच्या अनुदानातून पंधरा वर्षाखालील बारा खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार रुपयां प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती आशाताई पाटील यांच्या हस्तेखेळाडूंना अनुदान वितरित करण्यात आले. यावेळी बोलताना सुरेंद्र वाळवेकर म्हणाले की,शासनाने दिलेल्या या अनुदानामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाडूंना जास्तीतजास्त योजना पोहोचवून खेळांचा दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शांताबाई कनुंजे,
शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, बजरंग सपकाळ,सुनील माळी आदी उपस्थित होते.


To Top